मोठ्या भावाचा लहान भावावर रॉडने हल्ला

परतवाडा ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती / 17 जुलै : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मोठ्या भावाने आपल्या लहान भावावर संतापाच्या भरात लोखंडी रॉडने प्रहार करुन त्याला गंभीररीत्या जखमी केले. ही घटना अचलपूर तालुक्यातील म्हसोना या गावात घडली. विलास बळीराम दहीकर (31) असे जखमी युवकाचे नाव आहे. विलासचे वडिल बळीराम दहीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी आरोपी नामदेव दहीकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
म्हसोना येथील रहिवासी बळीराम दहीकर यांना तीन मुले आहेत. ते घरी असताना मोठा मुलगा नामदेवने आपला लहान भाउ विलासला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र विलासने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा नामदेवने त्याच्यासोबत भांडण केले आणि घरातील लोखंडी रॉड काढून त्याच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्लयात विलसला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी आरोपी नामदेव दहीकर याच्यावर गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या

Back to top button