सुपर स्पेशालिटीमधून महिलेचे दागीणे लंपास

अज्ञात चोरट्याने मारला डल्ला

अमरावती / 12 जुलै: अमरावती शहरातील अन्य सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच सुपर स्पेशालिटीसारखे हॉस्पिटलही आता चोरट्यांपासून सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयात आपल्या बहिनीसोबत आलेल्या एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागीणे आणि 4 हजार रुपयांची रोख रक्कम असा 44 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.
या महिलेने गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार ही महिला आपल्या बहिणीची प्रकृती बरी नसल्याने तिच्यासोबत तपासणीकरिता नंबर काढण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आली होती. तेव्हा तिच्या नकळत अज्ञात चोरट्याने तिच्या पर्समधील मंगळसूत्रातील सोन्याचे 35 मणी, कानातले सोन्याचे झुमके आणि 4 हजार रुपये रोख असा 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच महिलेने गाडगेनगर पोलिस ठाण्यात जावून तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. चोरीच्या या घटनेमुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button