माजी मंत्री जगदिश गुप्ता यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई हाती घेतला धनुष्यबाण

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
-असंख्य समर्थकांसह झाले दाखल
-माजी महापौरांसह दहा माजी नगरसेवक गुप्तांसोबत
अमरावती / 8 जुलै: आगामी अमरावती महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. अशातच आता भाजपाचे माजी नेते, माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवारी रात्री उशिरा आपल्या असंख्य समर्थकांसमवेत जगदिश गुप्ता यांची प्रवेश प्रक्रिया पार पडली. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अमरावतीच्या एका माजी महापौरांसह दहा माजी नगरसेवकांनीही शिंदे सेनेची वाट धरली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत जगदिश गुप्ता यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र महायुतीत अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि भाजपचे पाठबळ सुलभा खोडके यांना मिळाले. त्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल करुन जगदिश गुप्ता यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके या 60 हजार 87 मतं घेऊन निवडून आल्यात तर जगदीश गुप्ता हे चौथ्या स्थानावर होते. गुप्ता यांना 34 हजार 67 मतदारांनी पसंती दर्शविली होती. निवडणुकीदरम्यान भाजपने जगदिश गुप्ता यांच्यावर निष्कासनाची कारवाई केली होती.
निवडणुकीनंतर जगदिश गुप्ता यांना भाजपमध्ये पून्हा प्रवेश दिला जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. जगदिश गुप्ता यांनाही तशी अपेक्षा होती. पण यासंदर्भाने पक्ष पातळीवर वरिष्ठांकडून कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने गुप्ता यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रयत्नही सुरु केले होते. अखेर सोमवारी आपल्या असंख्य समर्थकांसमवेत जगदिश गुप्ता यांनी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतला.
अमरावती शहर आणि जिल्ह्यात भाजपाचे संघटन आणि राजकीय ताकद बळकट करण्यात जगदीश गुप्ता यांचा मोठा वाटा आहे. 1990 आणि 1995 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जगदीश गुप्ता विजयी झाले. विशेष म्हणजे याच काळात अमरावती पालिकेवर पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकला. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी गुप्ता यांचा पराभव केला. त्यानंतर 2016 पर्यंत जगदीश गुप्ता यांनी विधान परिषदेत प्रतिनिधीत्व केलं.
सोमवारी जगदीश गुप्ता यांच्यासमवेत शिवसेनेत प्रवेश घेणार्यांमध्ये भाजयुमो चे माजी जिलाध्यक्ष व माजी महापौर नितिन डहाके, भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी स्थायी समिति सभापति नितिन चांडक, जुगलकिशोर कासट, किशोर गोयनका, संदीप पटवा, मनोज खंडेलवाल, विनोद डागा, कैलाश लड्ढा, राज गुप्ता, राजू राठी व विलास रोंघे, मनपा चे माजी विरोधी पक्ष नेते सुरेंद्र पोपली, माजी नगरसेवक मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, चंद्रकांत चौधरी, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊलकर, कृष्णराव वानखडे, चंदुमल बिल्दानी, शंकर बुटे, दिलीप पोपट, चिखलदरा चे माजी नगरसेवक प्रा. डॉ. राजेश जयपुरकर व आनंद बक्षी यांच्यासह प्रशांत तायडे, विनोद डागा, सुधीर बोपुलकर, दिलीप झाडे, रविंद्र भुयार, राजकिशोर दायमा, संतोष गुप्ता, अरुण लवणकर, विजय गुप्ता, विजय पांडे, कमल पंजवानी, संदीप पटवा, राजू बिलगये, सुनिलसिंह चौहान, राजेंद्र माहुरे, दीपक खैरकर, मनोहर भारसाकले, प्रकाश डोफे, आशीष खाडेकर, गजानन चौधरी, गंगाराम चौधरी, नीलेश कदम, विनोद शिरसाट, प्रशांत हिवराले, मोहन मिश्रा, संजय देशमुख, कैलाश लड्ढा, राजेश हुतके, नीलेश मोहोड, नीलेश गुप्ता, प्रशांत तायडे, श्याम गावंडे, मुकेश उसरे, प्रमोद पांडे, राधेश्याम गुप्ता, श्यामसुंदर कारेगांवकर, रविंद्र भुयार, संतोष गुप्ता, मंगेश डहाके, सोहनलाल कुरील, विजय गुप्ता, गणेश रेखे, प्रकाश गुप्ता, चंद्रकांत चौधरी, संतोष मिश्रा, चंद्रकांत यादव, किशोर गंगवानी, अशोक जोशी, अनिल चौधरी, गजानन फरकाडे, जयंत देशपांडे, शशांक सुतलार, विनोद आष्टोनकर, भूषण डहाले, अनुराग काले, राजेंद्र राठी, संजय चव्हाण, विजय साखरकर, अनिल वानखडे, रणजितसिंह खमारे, अनिल तराले, कन्हैया बुंदेले, दीपक चव्हाण, रंजन पवार, चंद्रकांत घोगरे, चंद्रकांत उंबरकर, श्यामकांत चौधरी, नंदकिशोर बाचे, विनोद टाकोरे, तेजेंद्र मंजलवार, तनिश लड्ढा, उत्कर्ष साहू, प्रफुल ठवले, आदित्य यादव, जयंत ढोले, करण देशमुख, आशीष राजा, विवेक मिश्रा, यश साहू, नयनसिंह परिहार, रोहन सावरलाल, यश मोहोड, यश सावले, जितेंद्र बघेल, निकेश डोले, किशोर काटोलकर, प्रशांत वैद्य, प्रवीण पाटिल, प्रमोद लवणकर, पंजाब गोफणे, भगवानसिंह चौहान, संजय वानखडे, नाना तिडके, गोवर्धन रेवस्कर, देवेंद्र आसरे, अशोक जगताप, नितिन साटोटे, भगवान बेनिवाल, गौरव बोर्डे, सुरेश यादव, श्रीकांत वानखडे, कमलकिशोर गुप्ता, सुधीर बोपुलकर, योगेश कथले, सुनील शिरभाते, रुपेश पाटिल, प्रवीण माहुले, नरेंद्र काटोले, प्रफुल भेंडे, प्रणय हजारे, वासुदेव देऊलकर, पंकज काजे, विठ्ठल कंचनपुरे, सेवकराम लोखंडे, मनोज पोपटानी, संजय पाटिल, गोपाल करुले, महेश हेडा, अश्विन कोरट व विजय पांडे, संतोष गुप्ता, अनिल कैथवास, ओम पंचारिया, राजेश तिवारी, अमोल सूर्यवंशी, शरद राजणकर, छत्रपति ओगले, संतोष ठाकुर, संतोष रेचे, अनिकेत कडू, छोटू वानखडे, रामचंद्र गुप्ता, मधुलाल साहू, रवि साहू, केकराज धोटे, संजू साकेत, परमानंद अहेरवार, दिलीप हारडे, खुशाल जोशी, पवन दुबे, गणेश चढार, धीरज यादव, सुरजीत संधु, अजय शिंदे, रोहित जाधव, रितिक सोलंके, अतुल काले, गजानन खंडारे, विकास गायकी, विजय पिंजानी, प्रदीप कापडी, सुरेश यादव यांचा समावेश आहे.
-संघटन बळकट करणार
हिंदुत्वाचा विचार घेऊन विधानसभा निवडणूक लढवली. आता हाच विचार समोर नेत अमरावती शहरात शिवसेनेचं संघटन बळकट करणार आहे. येणार्या महापालिका निवडणुकीत आमचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक एकदिलाने प्रयत्न करणार आहोत, असं जगदीश गुप्ता यांनी म्हटलं आहे.




