दिल्लीच्या राष्ट्रीय एकता समागमात अमरावती नवोदयचा विजयघोष

समूह नृत्य, कथाकथन व एकल वाद्य वादन स्पर्धेत पुरस्कारांची कमाई

अमरावती / 25 नोव्हेंबर – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे 23-24 नोव्हेंबर रोजी आयोजित 25व्या राष्ट्रीय एकता समागम-2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अमरावती जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्वल केले. विद्यालयातील आयुशी संजय उज्जेंकर व स्नेहल मनोज देशमुख या विद्यार्थिनींनी कथाकथन या स्पर्धेत उत्कृष्टरित्या सादरीकरण करून देशात उपविजेतेपद मिळवले, तर मास्टर जीत सुनील खवले याने व्हायलीन या वाद्यप्रकारात आपले वादन सादर करून देशात तृतीय क्रमांक पटकावला व समूह नृत्य प्रकारात शिवाक्षी नरेंद्र हगवणे, ओजस्वी देवेंद्र काळबांडे, आर्या संजय गणेशपुरे व रितीका योगेश लुंगे या विद्यार्थिनींनी देशात तृतीय क्रमांक मिळवून अमरावतीचा गौरव देशपातळीवर वाढवला. या प्रसंगी नवोदय विद्यालय समिती दिल्ली चे आयुक्त श्री विकास गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे गुणगौरव केले. नवोदय विद्यालय समितीने संपूर्ण देशातील 665 नवोदय विद्यालयांमधून विभागीय, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कला, संस्कृती व संगीताशी संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी सर्व पातळ्या यशस्वीरित्या पार करत पुणे विभागाची राष्ट्रीय स्तरावरील दमदार छाप पाडली. पुणे संभागातील मध्ये समाविष्ट असणार्‍या महाराष्ट्र व गोवा या राज्यातील 36 नवोदयच्या विद्यार्थ्यांनी एकूण 6 पारितोषिक पटकावले असून त्यात अमरावती नवोदयने 3 पारितोषिक मिळवून विशेष उल्लेखनीय कामगिरी केली.शोभना घोष, तसेच सहउपायुक्त एस. पी. बोरसे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. एस. जे. गवई, एस. यु. हिसवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षक व विद्यार्थी यांनी सांगितले.

Back to top button