कौंडण्यपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पूजाभिषेक
कार्तिक कृष्ण प्रतिपदेनिमित्त मौली पूजन सोहळा

राजेश वानखडे, आरती वानखडे यांची उपस्थिती
अमरावती /25 नोव्हेंबर– श्री विठ्ठल-रुक्मिणी माता संस्थानच्यावतीने कार्तिक कृष्ण प्रतिपदेनिमित्त आयोजित मौली पूजन व अभिषेक सोहळा भक्तिभावात पार पडला. या धार्मिक कार्यक्रमात विधायक राजेश श्रीराम वानखडे आणि त्यांच्या सहधर्मचारिणी आरती राजेश वानखडे यांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजन, अभिषेक आणि आरती करून राज्यातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली.
वानखडे दाम्पत्याने मंदिरातील पुजार्यांच्या मंत्रोच्चारात मौली पूजन आणि अभिषेक विधी पार पाडला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सुख-शांती लाभावी, शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना केली. यावेळी संस्थानच्या पदाधिकार्यांशी त्यांनी संवाद साधत मंदिराची धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि वर्षभर राबविण्यात येणार्या विविध धार्मिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. संस्थानच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपण्यासोबतच विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले.भक्तिभावाने पार पडलेल्या या पूजन व अभिषेक सोहळ्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले. दर्शनानंतर वानखडे दाम्पत्याने उपस्थित भाविकांशी संवाद साधत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला.





