आ. सुलभा खोडकेंनी तालिका सभाध्यक्ष म्हणून सांभाळले कामकाज

अधिवेशनात सभागृहाची सुत्रे घेतली हाती

-अनुभव, शिस्त, संयम व सद्द्विवेक बुद्धीचा प्रत्यय
-अमरावतीकर सहकारी अभिमानाने भारावले
अमरावती / 3 जुलै: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2025 ला 30 जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य आणि अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली. अशातच आजच्या 3 जुलै रोजीच्या कामकाजादरम्यान विद्यमान अध्यक्षाच्या अनुपस्थितीत आ. सुलभा खोडके यांनी विधानसभेचे तालिका सभाध्यक्ष म्हणून कामकाज पहिले व सभागृह यशस्वीरित्या चालविले.
तालिका सभाध्यक्ष म्हणून विधानसभा सभागृहाची सूत्रे सुलभा खोडके यांनी उत्तमरीत्या सांभाळली. यावेळी त्यांनी आपला संसदीय अनूभव पणाला लावताना शिस्त, संयम आणि सद्विवेक बुद्धीचा प्रत्यय घडविला. खोडके यांनी या महत्वाच्या पदावरुन राज्यभरातील जनप्रतिनिधींना दिशानिर्देश करताना पाहुण त्यांची अमरावतीकर सहकारी आणि चहाते यांचा उर अभिमानाने भरुन आला. अनेकांनी याबाबतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र विधानसभेत नियम 293 नुसार महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सभागृहातील सदस्यांनी शेतकरी विकासाबरोबरच सुखी, समृद्ध, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हि चर्चा अत्यंत महत्वपूर्ण असतांना तालिका सभाध्यक्ष म्हणून विराजमान आ. सुलभा खोडके यांनी उत्तम प्रकारे सभागृह चालविले. त्यांनी नियोजित वेळेत प्रत्येक सदस्यांना बोलण्याची संधी दिली. तसेच सत्ताधारी सदस्यांबरोबरच विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांचे सुद्धा म्हणणे ऐकून घेतले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत: आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते. अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 8 पोटनियम 1 अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून सुलभाताई संजय खोडके विधानसभेचे कामकाज सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button