राजकमल पुलाच्या रखडलेल्या कामावर काँग्रेसची जिल्हा कचेरीवर धडक

जिल्हाधिकार्‍यांना उशिराबद्दल खुलाश्याची मागणी

संबंधित विभागाची बैठक घेण्यावर वेधले लक्ष
26 नोव्हेंबरला मशाल आंदोलनाचा इशारा

अमरावती/17 नोव्हेंबर– शहरातील राजकमल रेल्वे पुलाचे काम वर्षभरापासून रखडल्याने नागरिक आणि व्यापार्‍यांची मोठी गैरसोय होत असून, या प्रश्नावर शहर जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. कामाच्या विलंबाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, मंजूर निधी आणि झालेल्या खर्चाचा तपशील जाहीर करावा, रेल्वे प्रशासन व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख ठरवावी, अशा मागण्यांचे निवेदन काँग्रेसने जिल्हाधिकार्‍यांना दिले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास 26 नोव्हेंबरला राजकमल चौकात मशाल आंदोलन करून पुढे अमरावती बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
राजकमल रेल्वे पूल हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, पुलाचे काम रखडल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असून, बाजारपेठेतील व्यवसायावरही परिणाम झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. 8 महिन्यांपूर्वी निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले होते. तरीही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे कामातील अडथळे दूर करून कंत्राटदाराला निश्चित मुदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, मिलिंद चिमोटे, नगरसेविका अनिता काळे, प्रशांत महल्ले, लुबना तनवीर, राजश्री जठाळे, धीरज हिवसे, मालता गवई, डॉ. अर्चना आत्राम, अस्मा फिरोज खान, विक्की वानखडे, सुनीता भेले, ललिता रतावा, डॉ. संजय शिरभाते, अफसर जहां, मो. रेहान आदी उपस्थित होते. अनिल अग्रवाल यांनी पुलाचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले, याची चौकशी करून अहवाल जाहीर करण्याची मागणी केली. जिल्हाधिकार्‍यांनी 8 दिवसांत चौकशी आणि 15 दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासन, पोलीस व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. विलास इंगोले यांनी प्रशासनाच्या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बबलू शेखावत यांनी 26 नोव्हेंबरला राजकमल चौकात मशाल आंदोलन करण्याची घोषणा केली. मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास अमरावती बंद करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अमरावती बंदचा अल्टिमेटम
मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी जिल्हाधिकार्‍यांना काँग्रेसच्या निवेदनानंतर मीडियाशी बातचीत करताना म्हटले की, प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटमनंतर लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास काँग्रेस अमरावती शहरात कडकडीत हडताल करून दाखवेल. त्यांनी दावा केला की, उड्डाणपूल बंद होण्यामुळे केवळ नागरिक त्रस्त झाले आहेत असे नाही, तर व्यापारीही परेशान आहेत. लोकांना फेरा घेऊन ये-जा करावी लागत आहे. व्यवसाय प्रभावित झाला आहे. असे असतानाही प्रशासन आणि शासन पूलाच्या बांधकामाबाबत योग्य प्रकारे माहितीही देत नाही. सव्वा वर्षापासून पूल पाडण्याचे काम संथ गतीने चालू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने व्यापारी हितासाठी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला निवेदनात अल्टिमेटम दिला आहे. यावर जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वस्त केले आहे.

बंद कामाची होणार चौकशी
स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी माहिती देतांना सांगितले की , राजकमल पूलाचा विषय समस्त शहरवासीयांशी जोडलेला आहे. गेल्या सव्वा वर्षापासून शहरातील व्यवसाय प्रभावित झाला आहे. एव्हढे दिवस उलटूनही पूल पाडण्याचे काम धिम्या गतीने सुरु असल्याने 10 टक्केच झाले आहे. याकडे जिल्हाधिकार्‍यायंचे लक्ष वेधण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सदर पाडकामास विलंब का झाला याचे उत्तर मागविण्यात आले आहे. याचा अहवाल सर्वांसमोर उघड होणे आवश्यक आहे. अनिल अग्रवाल यांनी असेही सांगितले की, जिल्हाधिकार्‍यांनी या मुद्यावर सकारात्मक भूमिका घेतली असून 8 दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. याअंतर्गत बांधकाम विभाग, रेल्वे व संबंधित प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाची 15 दिवसात सामान्य बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. अनिल अग्रवाल यांनी असेही सांगितले की, व्यापार्‍यांना होत असलेल्या त्रासाबद्दल हा मुद्दा विधानसभेपासून लोकसभेपर्यंत चर्चेत आहे. तरीसुध्दा पूलाच्या बांधकामाबाबत काँग्रेसने ठोस भूमिका घेतली आह

Back to top button