हिट अँड रनच्या आरोपीस 6 तासात अटक

सेवानिवृत्त एएसआय कर्मचार्‍यास धडक देऊन पसार

अकोला/16 नोव्हेंबर- अकोला शहरातील व्यस्त समजल्या जाणार्‍या इन्कम टॅक्स चौक परिसरात रविवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी एका दुर्दैवी अपघातात 65 वर्षीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर वाहनासह घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या व तांत्रिक तपासाचा अचूक वापर करत अवघ्या 6 तासांच्या आत आरोपीला आणि अपघातास कारणीभूत वाहनाला ताब्यात घेण्यात आले.रविवार 15 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे मयत सेवानिवृत्त एएसआय अरुण लक्ष्मणराव मेतकर वय 65 वर्षे, रा. व्हीएचबी कॉलनी, गौरक्षण रोड,अकोला हे 6.45 वाजता मॉर्निंग वॉक साठी इन्कम टॅक्स रोडवरून जात असताना, भरधाव वेगाने आलेल्या अद्यात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी खदान पोलीस स्टेशन येथे कलम 194 भा. न्या. संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभीर्य पाहता अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना तात्काळ पथक तयार करून पसार झालेल्या वाहन चालकाच्या शोध घेण्याचे आदेश दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा चे पथकांनी समांतर तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सूत्र हलवली. सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 6 तासांच्या आत या अज्ञात वाहनाचा व चालकाचा माग काढून आरोपी नामे कुणाल राजु बगळेकर वय 30 वर्षे, रा. नागे ले- आउट, कौलखेड अकोला यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील वाहन महेंद्र गएएढज क्रमांक- चक30 अत 0588 ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करिता खदान पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई ही अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे, नितीन लेव्हरकर यांच्या गोपाल जाधव, वसीमुद्दीन, रवी खंडारे, अन्सार अहमद, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमिर यांनी केली.

Back to top button