राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतून प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाचा शंखनाद

हिवाळी अधिवेशनावर बळीराजा संघटनेचा निर्णायक ट्रॅक्टर मार्च

अमरावती/16 नोव्हेंबर  : तिन दशकांपासून न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणार्‍या प्रकल्पग्रस्तांच्या पदरी शासनाने केवळ आश्वासनाचे गाजर टाकून वेळ मारुन नेल्याचे सातत्याने होत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येते.
जमीनी गेल्या घरे गेलीत हजारोंचे संसार उद्ध्वस्त झालेत.अनेक प्रकल्पग्रस्त तरुणांनी आपले जिवन संपवले.न्याय मात्र अजुनही मिळाला नाही.शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी हतबल झाला असून आता या अन्यायाविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी प्रकल्प ग्रस्तांनी संघर्षाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली असुन हजारो प्रकल्प ग्रस्तांनी संघर्षाचा शंखनाद केला आहे. मोझरी येथील भुवैकुंठ अध्यात्म गुरूकुल येथे बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्रकल्पग्रस्तांची विचार मंथन व नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते.विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला पुरुषांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.येणार्‍या 14 डिसेंबर रोजी अमरावती ते नागपूर असा प्रचंड मोठा ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आला असुन संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त यामध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांनी सांगितले आहे.आता आश्वासन नको तर न्याय हवा. अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.मनोजभाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सभेचेअध्यक्षस्थान जेष्ठ शेतकरी नेते सुरेश फुंडकर गुरुजी यांनी भुषविले.यावेळी सचिव गौतम खंडारे, संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.निलेश ठाकरे, संजय गीद, पत्रकार संजय मुंडोळकर,रवीदादा मानव,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बोडखे, मनोज तंबाखे,राजु लोणकर, सुधिर निस्ताने संदीप राऊत, सतिश भाऊ मेटांगे अरुण पाटील,विवेक डेहनकर, त्रिशूल सराड, रामेश्वर भेटे सुनिल भाकरे, विलास पाटील,प्रशांत ठाकरे, ओंकार कोल्हे,शुभम डोणालकर, रियाज पटेल जेष्ठ कलावंत डाखोरे भाऊ,नयन लुंगे सुनील देशमुख, प्रकाश बोबडे, अरविंद फुले,राजु तिवसकर, आदी प्रकल्पग्रस्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला सत्यपाल महाराजांची आकस्मिक भेट.प्रकल्पग्रस्तांच्या विचार मंथन सभेदरम्यान सप्तखंजरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आकस्मिक भेट दिली.त्यांनी आपल्या परखड व सत्यवाणीतील प्रबोधनातून प्रकल्पग्रस्तांचे मनोबल उंचावले न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याची वज्रमूठ अधिक मजबूत करण्यासाठी उपस्थितीतांना प्रेरित केले.त्यांच्या भेटीने सभेला विशेष उर्जा मिळाली सत्यपाल महाराजांनी संघर्षाची दिशा ठरविण्यासाठी अमुल्य असा संदेश दिला.

Back to top button