निवृत्त पोलिस कर्मचारी राजेश पाटील यांची आत्महत्या
राहत्या घरी घेतला गळफास

अमरावती / 1 जुलै: अमरावती शहर पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेले पोलिस कर्मचारी राजेश वानखडे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आपल्यासंजय गांधी नगर परिसरातील प्रभात रेसिडेन्सीमधील निवासस्थानी स्वत:ला गळफास लावून घेत राजेश पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपविली. अमरावती पोलिस विभागातून निवृत्त झाल्यानंतर राजेश पाटील हे धामणगाव रेल्वे तालुक्यातील आपल्या गा वात शेती करित होते. अमरावती येथे संजय गांधी नगरात प्रभात रेसिडेन्सी मध्ये अस लेल्या फ्लॅटमध्ये ते कुटुंबासह वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी राजेश पाटील यांनी आपला 60 वा वाढदिवस कुटुंबिय आणि मित्रमंडळीसमवेत साजरा केला होता. मित्र परिवारात मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच राजेश पाटील यांनी असे आत्मघाती पाउल उचलल्याबद्दल अनेकांना मोठा धक्का बसला आहे. राजेश पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आणि पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. आप्त स्वकियांसह त्यांच्या मित्र मंडळींनी पाटील यांच्या घरी यावेळी गर्दी केली होती. राजेश पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ट होउ शकले नाही.




