थकीत मालमत्ता करापोटी कोठारी टर्मिनलला मनपाकडून सील

अमरावती/6 नोव्हेंबर- अमरावती महानगरपालिकेच्या पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत दस्तूरनगर येथील वॉर्ड उ-2 मधील कोटारी टर्मिनल, चैतन्य कॉलनी येथील मालमत्ता क्रमांक 3962-17, 3962-9 व 3962-10 या मालमत्तांवर तब्बल 1 लाख 77 हजार 230 रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने जप्तीनाम्यानुसार गुरुवार, दिनांक 5 नोव्हेंबर 2026 रोजी संबंधित मालमत्तांना सील करण्यात आले.
थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. पूर्व झोन क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक क्षेत्रीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अजय चव्हाण, आकाश चौधरी आणि आनंद बुंदिले यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. महानगरपालिकेच्या थकीत कर वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदार मालमत्तांवर नियमानुसार कारवाई सुरू असून, नागरिकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Back to top button