‘प्रियदर्शनी इंदिरा गांधी आदर्श कन्यारत्न पुरस्कार’
विदर्भकन्या कवयित्री तृप्ती राजेश मुदगल यांना

अमरावती जिल्ह्याचा साहित्यिक नावलौकिक उंचावला
अमरावती/6 नोव्हेंबर : जिल्ह्याची विदर्भकन्या, युवा कवयित्री, साहित्यिका व संशोधिका तृप्ती राजेश मुदगल (काव्य मधुराज्ञी) यांना कोल्हापूर येथे आयोजित प्रियदर्शनी इंदिरा गांधी साहित्य संमेलनात ‘प्रियदर्शनी इंदिरा गांधी आदर्श कन्यारत्न पुरस्कार 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणार्या या पुरस्कारासाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या महिलांमधून उत्कृष्ट युवा कवयित्री म्हणून त्यांची निवड झाली. त्या अमरावतीतील नामांकित श्री निळकंठ व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. घनश्यामजी मुदगल यांच्या ज्येष्ठ नात आहेत. तृप्ती यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लेखनास सुरुवात केली. पाचवीत शिकत असताना तत्कालीन आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते त्यांना जिल्हास्तरीय बालकवयित्री पुरस्कार प्राप्त झाला. पुढे 2022 मध्ये तत्कालीन कॅबिनेट मंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट युवा कवयित्री म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. बालवयात सुरू झालेला त्यांचा साहित्यप्रवास आज राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, यंदा पुणे विद्यापीठातून एमबीए (बिझनेस नालिटिक्स) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.





