मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव

80 हजारांची लाच घेतांना ताब्यात

निवृत्तीला दोन दिवस बाकी असतांना नावाला बट्टा

स्वीयसहाय्यकासह लेखापाल गजाआड

नाशिक /29 ऑक्टोबर : मालेगाव महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. ठेकेदाराची बिले मंजूर करून देण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जाधव हे 31 ऑक्टोबर 2026 रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी असताना ही कारवाई झाल्याने मालेगावच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदाराची प्रलंबित बिले काढून देण्यासाठी चार टक्के दराने 80 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह आणखी दोघांना एसीबीने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. कारवाईनंतरअधिकार्‍यांनी त्यांच्या निवासस्थानी झडतीही घेतली. या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.रवींद्र जाधव हे 16 डिसेंबर 2023 पासून मालेगाव महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी धुळे महापालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत असताना, 14 जानेवारी 2019 रोजी त्यांना एका उपशिक्षकाकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात एसीबीने ताब्यात घेतले होते.मालेगावमध्ये नियुक्ती झाल्यानंतरही त्यांच्या नियुक्तीला काही स्थानिक संघटनांनी विरोध केला होता. महापालिकेतील कचरा संकलन निविदा, मोसम नदीचे प्रदूषण, जन्मदाखले आणि आर्थिक व्यवहार अशा विविध मुद्द्यांवरून त्यांच्या कार्यकाळात वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणांवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आक्षेप घेतले होत

Back to top button