राहुल गांधी मानहानी प्रकरणात निर्दोष
अमित शहांविरोधात अवमानकारक विधान केल्याचा होता आरोप

2018 मध्ये दाखल झाला होता गुन्हा
सुलतानपूर/26 ऑक्टोबर : सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने सोमवारी अमित शहा यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यातून राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली. भाजप नेते विजय मिश्रा यांनी ऑगस्ट 2018 मध्ये राहुल गांधींविरुद्ध हा खटला दाखल केला होता.
आरोपानुसार, 8 मे 2018 रोजी बेंगळुरू येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते, जे पक्ष प्रामाणिकपणाच्या गप्पा मारतात, त्यांच्या अध्यक्षांवरच हत्येचा आरोप आहे.
न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नृत्य केले, फटाके फोडले आणि राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तत्पूर्वी, सोमवारी सकाळी पूर्वांचल एक्सप्रेसवेवर राहुल गांधींच्या ताफ्यातील पाच वाहने एकमेकांवर आदळली. या वाहनांमध्ये एका रुग्णवाहिकेचाही समावेश होता. या अपघातात राहुल गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.





