सावकारांनो सावधान! शेतकर्यांना अडचणीत आणाल तर..
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद
बुलडाणा/4 ऑक्टोबर : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांची उभी पिकं करपून गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. यानंतर मंत्री आमदार खासदार दुष्काळी भागात दौरे करत आहेत. आज राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव जिल्ह्यात दौरा केला.
यावेळी त्यांनी बँका आणि सावकरांना कडक शब्दात इशारा दिला आहे. शेतकर्यांना अडचणीत आणणार्या सावकारांना अडचणीत आणण्याच्या सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
सध्या राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँका आणि सावकरांना कडक शब्दात इशारा दिला आहे. शेतकर्यांना अडचणीत आणणार्या सावकारांना अडचणीत आणण्याच्या सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. सरकारी बँक ते खाजगी बँक थोडीही शेतकर्यांना फोन करु नका, शेतकर्यांनी आत्महत्या केल्यास त्याला बँका जबाबदार राहतील, असा इशारा थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकर्यांची पिकं वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावकरांना आणि बँकांना थेट इशारा दिला आहे.





