शिवसेना उबाठा पक्षाने जाळला शासन निर्णय

हिंदी सक्तीविरोधात आंदोलन

-महायुती सरकारचा केला निषेध
अमरावती / 29 जून: इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांत हिंदी भाषा शिकविण्याची सक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय जाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने राज्यातील महायुती सरकारचा निषेध नोंदविला. इर्विन चौकात शिवसेना उबाठा पक्षाचे शहर प्रमुख प्रविण हरमकर आणि जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या नेतृत्वात हिंदी सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मुंबई येथे आज हिंदी सक्तीचा शासन निर्णय जाळून उबाठा पक्षाच्या वतीने सरकारविरोधात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्याच्याच समर्थनार्थ अमरावती येथेही पक्षाचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यांनी तीव्र निदर्शने केलीत. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही मात्र पहिलीपासून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भाषेचा भार थोपवू नये, अशी आमची मागणी असल्याचे प्रविण हरमकर म्हणाले. भाजप सरकार केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हिंदी भाषिकांच्या मतांवर डोळा ठेवून भाषेचे राजकारण करित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात प्रविण हरमकर, मनोज कडु यांच्यासह पश्चिम विदर्भ युवासेना प्रमुख सागर देशमुख, प्रदीप बाजड, गोविंद दायमा, जवहार गेट विभाग प्रमुख मनीष रमावत, नितीन तारेकर, आनंद राठी, निकेश शर्मा, युवा सेना शाखाप्रमुख जवहार गट रुपेश आलेकर, शेख नसीम मोहम्मद रशीद, संदीप मानेकर, जुगल महाराज दवे, विनोद मंडळकर चंद्रशेखर गिरी, प्रफुल भोजने, उपजिल्हाप्रमुख प्रमोद कोहडे, तालुकाप्रमुख नांदगाव खंडेश्वर संजू थुले, नरेश वानखडे, दत्ता ढोमणे, गब्बर पठाण, संजय होले, प्रतिभा बोपशेट्टीवार, विकी गुहे, शेख अजीम लाला, उमेश केडिया, कांचन ठाकूर, विजू ठाकरे, पंजाबराव तायवाडे, नितीन हटवार, आशिष प्रमोद वानखडे, दिलीप काकडे, पार्थ हरमकर, तुषार अनासने, सुरेश चौधरी, ईश्वर खळेकार, दिलीप केणे, मनोज मोहरे, भास्कर सोनटक्के, नरेंद्र देऊळकर, नरेश वानखडे, बंडू यादव, विश्वजीत मेश्राम, तलिश पठाण, उमेश जयस्वाल, रणजीत दिवे, रमेश धावणकर, उमेश केडिया, गजानन यादव, निलेश मुन्नाने, विनोद शेलोकार, दिलीप बाममोटे, निलेश ढोले, अजिंक्य पाटणे, अतुल सावरकर, नानाजी देऊळकर, दिलीप देवताळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button