जल्लोषात विदर्भाच्या राजाला भावपूर्ण निरोप…

अमरावती ; खापर्डे बगीचा येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक गुरुवारी रात्री स्थानिक राजकमल चौकात पोहोचली. यावेळी भाविकांनी मूर्तीवर पुष्पवृष्टी करत एकच जल्लोष केला. आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांसह गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या… आवाजाने शिस्तीत आणि मस्तीत संपूर्ण परिसर दणाणून गेला. मंडळाचे प्रमुख दिनेश बूब, सोहळ्याचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह लोकप्रतिनिधी व समाजसेवकांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. बाप्पाचे लोभस रूप पाहण्यासाठी राजकमल चौकात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती





