वैष्णोदेवी व कालभैरव मंदिराच्या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन
राजापेठ स्पोटिंग क्लबचा 41 वा गणेशोत्सव

नवनित राणा यांची प्रमुख उपस्थिती
अमरावती/20 सप्टेंबर- गेल्या 41 वर्षांपासून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करणार्या राजापेठ स्पोर्टिंग क्लब गणेशोत्सव मंडळाला यंदाही भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या वैष्णोदेवी मंदिर व कालभैरव मंदिराच्या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले. राजापेठ स्पोर्टिंग क्लबच्या गणेशोत्सवाला चार दशकांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा आहे. दरवर्षी नागरिकांना धार्मिक व आध्यात्मिक स्थळांचे दर्शन घडावे, तसेच भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख व्हावी, या उद्देशाने मंडळाच्या वतीने भव्य आणि आकर्षक देखावे साकारले जातात. यापूर्वी मंडळाने शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, महाकाल मंदिर यांसह विविध धार्मिक स्थळांवर आधारित देखावे सादर केले आहेत. त्यासोबतच सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारे देखावेही मंडळाच्या वतीने साकारण्यात आले आहेत.यंदाच्या वैष्णोदेवी मंदिर व कालभैरव मंदिराच्या देखाव्यामुळे भाविकांना धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळत असून, देखाव्याची आकर्षक सजावट, प्रकाशयोजना आणि मंदिराची प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या देखाव्याला भेट देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
राजापेठ स्पोर्टिंग क्लबचा उपक्रम केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून, क्लबच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रदानासंदर्भातील उपक्रम, तसेच विविध सांस्कृतिक व संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उद्घाटन कार्यक्रमाला श्रीसंत राजेश मोरडीया, उपमहापौर सचिन भेंडे, शहर सुधार सभापती राधा कुरील, नगरसेवक प्रशांत वानखडे, नगरसेविका नंदा सावदे, महेश मुलचंदानी, शिवसेना गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, नगरसेवक योगेश विजयकर, दीपक सम्राट, सुनील खराटे, ललित समदुरकर यांच्यासह राजापेठ स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजापेठ स्पोर्टिंग क्लबच्या 41 वर्षांच्या परंपरेचे कौतुक करत मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याला शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा मंडळाचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष श्री.जयंत पडवार, डॉ.धनंजय बोबडे, प्रमोद सोनोने, गजानन ठाकरे, योगेश बहिरुवाले, दिनेश सेठीया, नितीन बोरेकर, राजा बांगडे, अविनाश काळे, शुभम उंबरकर,पराग चिमोटे,अशोक पांडे,अमोल इंगळे, शंकर राऊत, प्रदिप धाडेकर, चैतरामजी किरणपुरे, धनंजय बोबडे, रमेश शेळके, रामेश्वर लोहे, अरविंद भगत, अशोक श्रीवास, सुरेश चारमोरे अंकित अशोक गादर, वंश जाधव, साहिल शिंदे,प्रा.प्रशांत ठाकरे, प्रा.मनिष गायकवाड, संतोष भगत, पप्पु पाटील, अतुल बोबडे, रमेश कनपटे, सुनिल तुमसरे, वेंदात मामुरकर, आदिची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.





