सीबीआय अधिकारी सीमा पाहुजाकडे
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी

निष्णात तपास अधिकारी अशी ओळख
मुंबई/16 सप्टेंबर : दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणात एफआयआर दाखल केल्याने आता तपासाला वेग आला आहे. आता या तपासाची जबाबदारी उइखच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आता हे प्रकरण लवकर मार्गी लागेल अशी शक्यता असून या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या प्रकरणाला 6 वर्षांचा काळ लोटल्याने सीमा यांच्यापुढे मोठं आव्हानही असणार आहे. सीमा पाहुजा सध्या उइखच्या दिल्लीतील विशेष गुन्हे विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. संवेदनशील आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांच्या तपासाचा त्यांना अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी हाथरस, उन्नाव आणि कोलकाता येथील आर. जी. करप्रकरणांसारख्या महत्त्वाच्या तपासांमध्ये काम करण्यात आले आहे.
सीमा पाहुजा यांच्या अनुभवामुळे दिशा सालियन प्रकरणातील विविध पैलूंचा तपास आता अधिक बारकाईने होण्याची शक्यता आहे. उइखकडून यापूर्वी झालेल्या तपासातील नोंदी, कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची पुन्हा छाननी केली जाऊ शकते.





