मालखेड येथे जुगार अड्ड्यावर छापा, 9 जणांना अटक
चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई

चांदुर रेल्वे/ 27 जून : चांदुर रेल्वे तालुक्यातील मालखेड येथे आठवडी बाजार परिसरात बीएसएनएलच्या टॉवरजवळ सार्वजनिक ठिकाणी अड्डा भरवून जुगार सुरु असताना त्यावर चांदुर रेल्वे पोलिसांनी छापा मारला आणि जुगार खेळत असलेल्या 9 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे चांदुर रेल्वे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी एक्का बादशहा नावाचा हारजीतचा जुगार खेळत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुमेरसिंग दासू चव्हाण (38), चंदु हंजा चव्हाण (65), दीपक विष्णू चव्हाण (55), प्रेमदास शिवलाल चव्हाण (52), सुधीर शालीकराम चव्हाण (38), राजु वासुदेव जाधव (49, रा. सर्व लालखेड), प्रविण सुधाकर मेश्राम (34), राम अंबादास काळसर्पे (28) आणि अशोक लक्ष्मण जेवडे (62, सर्व रा. मालखेड) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक अजय आकरे, उपनिरिक्षक रोहित कुदळे, अंमलदार शिवाजी घुगे, निलेश रिठे, गजानन वाघमारे, प्रविण मेश्राम, अतुल क्षिरसागर, प्रशांक ढोके यांनी केली.




