आईने किडनी देऊन वाचवले मुलाचे प्राण
सुपर स्पेशलिटीमध्ये प्रत्यारोपण

-रुग्णालयातील 54 वी यशस्वी शस्त्रक्रिया
अमरावती / 27 जून : अमरावतीच्या संदर्भ सेवा रुग्णालयात अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 54 वे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले. 18 वर्षीय मुलगा त्याच्या आईने किडणी देवून त्याचे प्राण वाचविले. गौतम मुकेश प्रेमचंदानी याच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गौतम प्रेमचंदानी हा बडनेरा येथील रहिवासी असुन मागिल 1 महिन्या पासून रुग्ण किडनी आजाराने त्रस्त होता.
गौतमवर डायलिसिस उपचार सुरु होते. मात्र हा दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितले. त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून आई रोशनी मुकेश प्रेमचंदानी (38) वर्ष यांनी आपली एक किडनी मुलगा गौतमला देण्याचा निर्णय घेतला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ. नयन चौधरी (काकडे), युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतिक चिरडे, डॉ. विशाल बाहेकर, बधिरिकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. शितल सोळंके, डॉ. अश्विनी मडावी, डॉ. अंजु दामोदर, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ. सोनाली चौधरी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मधील एम.सी.ओ. डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, त्याचप्रमाणे अधीसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर ज्योती तायडे, ज्योती काळे, लता मोहता, सरला राऊत, नीता कांडलकर, पूजा लांडे, दिपाली तायवाडे, अभिजीत निचत, वैष्णवी निकम, अक्षय पवार, मयुरी खेरडे,अनु वडे,योगिश्री पडोळे,रेखा विश्वकर्मा, वैशाली ढोबळे, जमुना मावसकर,वैभव भुरे, अभिजीत खंडारे, शितल वायझाडे, कुणाल कोरे,आहारतज्ञ, कविता देशमुख, रश्मिता दिघडे,औषध विभागामधील योगेश वाडेकर, पंकज बेलुरकर, आशिष तायडे,गजनान मातकर,सुनीता ठाकूर, ज्ञानेश लांजेवार, सागर गणोरकर, अविनाश राठोड, आशिष मिश्रा, शिवा भंगाळे, राहुल चव्हाण, रुपेश हरडे, आशिष स्थूल, पाटील,दिपटे, भेंडकर, गजानन चौधरी,प्रशांत थेटे, निलेश आत्राम इत्यादींचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विषेश सहकार्य होते.
———-




