नीट आंदोलकांवरील एफआयआर रद्द
सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

सीजेपीचे 5 सप्टेंबरचे आंदोलन मागे
नवी दिल्ली/1 सप्टेंबर : नीट पेपरफुटीच्या जुलै महिन्यातील निषेध आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि चार राज्यांच्या अपीलानंतर, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द केले आहेत. विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व खटले रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142 चा आधार घेतला, जे न्यायालयाला ‘संपूर्ण न्याय’ करण्याचा अंतर्निहित अधिकार प्रदान करते. न्यायालयाच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, कॉक्रोच जनता पक्षाने 5 सप्टेंबर रोजी नियोजित असलेले त्यांचे देशव्यापी आंदोलन आणि मोर्चाचे आवाहन अधिकृतपणे मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
नीट पेपरफुटीविरोधात आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 20 जुलै रोजी सीजेपीने जंतर मंतर ते संसद असा चलो संसद मार्च काझला होता. या विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला होती. तसेच पॅलेट गनचाही वापर झाल्याचा आरोप आहे.





