6 जुलैला राजस्थानी समाजातील गुणवंतांचा सत्कार
10 वी, 12 वीतील विद्यार्थी सन्मानित होणार

-राजस्थानी हितकारक मंडळाचा उपक्रम
-हॉटेल महफिल इनमध्ये आयोजन
अमरावती / 26 जून: राजस्थानी हितकारक मंडळाच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेनुसार येत्या 6 जुलै रोजी स्व. सौ. विजयादेवी ब्रिजमोहन मुंदडा यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता हॉटेल महफिल इनच्या सभागृहात पार पडणार असलेल्या या कार्यक्रमात राजस्थानी समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची तयारी राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि सचिव रामेश्वर गग्गड यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एका संयोजक मंडळाचे गठन करण्यात आले आहे. त्यांच्या देखरेखीत आयोजनाची रुपरेखा आखली जात आहे. संयोजन मंडळाची बैठक मंडळाचे सचिव रामेश्वर गग्गड यांच्या सक्करसाथ स्थित कार्यालयात बुधवारी पार पडली. यावेळी 6 जुलै रोजी आयोजन गुणवंतांच्या सत्कार समारंभात समाजातील दहावीमध्ये 90 टक्के आणि बारावीमध्ये 85 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्याचे निश्चित करण्यात आले.
संयोजन मंडळामध्ये गोपाल चांडक, संजय राठी, प्रा. मुकेश लोहिया, प्रा. गिरीश डागा, राजेश मित्तल, श्याम शर्मा, विरेंद्र शर्मा, समता केडिया, सोनाली राठी यांचा समावेश आहे. त्यांनी राजस्थानी समाजातील दहावी आणि बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच त्यांच्या पालकांनी या सत्कार सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
– 1 जुलैपर्यंत येथे करा नोंदणी
राजस्थान समाजातील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी आवाहन करताना विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी गुणपत्रिकेसह 1 जुलैपर्यंत नाव नोंदवावे असे कळविण्यात आले आहे. त्यासाठी खापर्डे बगिचा स्थित सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेवलपर कार्यालय (मंडल कॉम्पेक्स), सक्करसाथ चौक स्थित गग्गड प्रिंटर्स, राजकमल चौक स्थित श्रीनिवासा मॉलमध्ये गोपालजी चांडक यांच्याकडे किंवा मालविय चौकातील अॅड. गौरव लुणावत यांच्या आर. के. ट्रेडस येथे नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजस्थानी मंडळाचे सचिव रामेश्वर गग्गड (9445135212) आणि संजयकुमार राठी (9404103384) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.




