पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौर्‍यावर

विविध विभागांच्या आढावा बैठका घेणार

अमरावती / 26 जून: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या शुक्रवार, 27 जून रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍यानुसार, पालकमंत्री बावनकुळे यांचे सकाळी 11.45 वाजता कौंडण्यपूर येथे आगमन होईल. तेथे श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिरला भेट देवून ते दर्शन घेतील. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1 वाजता कौंडण्यपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील.
दुपारी 2 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, विसावा कॉलनी येथे कृषी विभाग आढावा बैठक. दुपारी 3 वाजता मुख्य अभियंता महापारेषण यांचे कार्यालय, प्रकाश सरिता, वेलकम पॉईंट येथे महावितरण व महापारेषण विभागांची आढावा बैठक. दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभार्थ्यांना शेतजमीन आदेश व शेतजमीन पट्टे वितरण करतील. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जनसंवाद कार्यक्रम होईल. रात्री 8 वाजता मोटारीने अमरावतीहून नागपूरकडे प्रस्थान करतील.

संबंधित बातम्या

Back to top button