राष्ट्रवादी एमपी अन् पीएम यांची 25 दिवसांत चौथी भेट

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात एनसीपी शरद पवार गटाचे 8 खासदार मोदींना भेटले; कारण काय?

नवी दिल्ली/10 ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या आठ खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली.
मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर लोकहिताच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. भेटीच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी संसदेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपापल्या मतदारसंघातील व राज्याशी संबंधित कळीचे मुद्दे लावून धरले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button