ट्रकच्या धडकेत ऑटोतील दोन प्रवासी ठार, चार जखमी
पातुर बाळापुर रोडवर भीषण अपघात

अकोला / 24 जून: बाळापूर ते पातूर रोडवर स्थित आयटीआय कॉलेज एमआयडीसीजवळच ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात दोन जण जाग्यावरच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी, 24 जूनचे सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.
पातूरकडून प्रवासी ऑटो क्रमांक एम.एच.30 बीसी 2071 हा अंबाशी येथे जात असताना ट्रक क्रमांक एम.एच. 18 बीजी 8494 याने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर असणार्या ऑटोला मागून धक्का मारल्याने सदर ऑटो व विरुद्ध दिशेने येणार्या ट्रक क्रमांक एम.पी.09 एचएच 4426 ला जाऊन धडकला त्यामुळे जोरदार धडक झाली असल्याची माहिती उपस्थित काही नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑटोमधील प्रवासी पियुष रविंद्र चतरकर (वय अंदाजे 13) रा.सिंधी कॅम्प,अकोला व लिलाबाई ढोरे (वय अंदाजे 50) रा.लाखनवाडा हे दोघे जागीच ठार झाले.
तर सुरेंद्र चतरकर (वय 45), रविंद्र चतरकर (वय 52), रूपंचंद वाकोडे (वय 50), प्रमिलाबाई वाकोडे (वय 65) हे जखमी झाले. असून पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीस पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने व खाजगी वाहणाने प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे उपचारासाठी पाठविले. तर घटनास्थळाचा पंचनामा केला. असून पुढिल कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.




