राहुल गांधींनी विरोधीपक्षासोबत गांधी स्मृतीस्थळापर्यंत मोर्चा
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा केला निषेध

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
नवी दिल्ली /23 जुलै : नीट पेपरफुटीप्रकरण आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे सध्या देशातील राजकीय तणाव वाढत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सलग चौथ्या दिवशीही कामकाज न होता तहकूब झाले. विशेष म्हणजे मंगळवारी (21 जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यानंतर आज (23 जुलै) राहुल गांधी गांधी स्मृतीस्थळी इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत आंदोलन करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गांधी स्मृतीस्थळावर इंडिया आघाडीची एकजूट दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत पुढील कृतीचा आराखडा तयार करण्यात आला आणि त्यानंतर राहुल गांधी व इतर सर्व इंडिया आघाडीचे खासदार तीस जानेवारी मार्ग याठिकाणी असलेल्या ‘गांधी स्मृती’कडे बसमधून निघाले.




