गाडगेनगरात बॅग लिफ्टर, फ्रेजरपूर्‍यात तडिपाराला अटक

-गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई

अमरावती / 24 जून: अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट – 1 च्या पथकाने गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करताना एका बॅग लिफ्टरला अटक करण्यात यश प्राप्त केले. तसेच या पथकाने फे्रजरपूरा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका तडीपार सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिनेश शिवलिनदास भोसले (19, रा. राजुरा बेडा, अमरावती) असे बॅग लिफ्टरचे आणि यश उर्फ गांधी विनोद तायडे (20, रा. कल्याण नगर, अमरावती) असे तडीपार आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, 22 जून रोजी मार्की, भातकुली येथे राहणार्‍या 24 वर्षीय युवकाने गाडगेनगर पोलिस ठाण्यात बॅग चोरीची तक्रार नोंदविली होती. क्लासेसच्या पर्किंगमध्ये झोपलो असताना अज्ञात चोरट्याने 32 हजार रुपयांचा मोबाईल आणि 500 रुपये रोख असलेली बॅग चोरुन नेल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांसोबतच गुन्हे शाखा युनिट – 1 ने समोतर तपास सुरु केला होता. या घटनेत राजूरा बेड्यावरील दिनेश भोसलेचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने त्याला शिताफीने अटक केली आणि त्याच्याकडून बॅगमधील मोबाईल व रोख जप्त केली.
दुसर्‍या कारवाईबाबत प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक शहरातील अवैध धंद्यांवर छापे मारण्यासोबतच तडीपार आणि निगराणी बदमाशांची तपासणी करित होते. तेव्हा फ्रेजरपूरा हद्दीतील तडीपार असलेला आरोपी यश उर्फ गांधी विनोद तायडे हा तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरातील नरसिम्हा महाविद्यालय परिसरात हजर असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. गुन्हे शाखेने या आरोपीला ताब्यात घेतले आणि फ्रेजरपूरा पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर, सागर पाटील, सहाय्यक पोलसि आयुक्त शिवाजी बचाटे, कैलास फुंडकर, अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनिष वाकोडे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, हेकॉ सतिश देशमुख, फिरोज खान, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड, अलीमउद्दीन खतीब, नाझीमोद्दीन सैय्यद, विकास गुढधे, सचिन भोयर, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, रणजीत गावंडे, अशोक खंगार, किशोर खेंगरे यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button