धारणी-चिखलदरा येथे स्वतंत्र कृषि अधिकारी कार्यालय सुरू करा

आ. काळें यांची विधानसभेत मागणी

चिखलदरा/3 जुलै: मतदारसंघातील धारणी व चिखलदरा या दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये स्वतंत्र तालुका कृषि अधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे तसेच कृषि विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी जोरदार मागणी आ. केवलराम काळे यांनी आज विधानभवनात केली. या विषयावर त्यांनी शासनाचे लक्ष वेधत मेळघाटातील शेतकर्‍यांच्या अडचणी सभागृहात प्रभावीपणे मांडल्या.
आ. काळे यांनी सांगितले की, धारणी व चिखलदरा या दुर्गम भागातील शेतकर्‍यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, तांत्रिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच विविध शासकीय सेवांसाठी मोठा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र कृषि अधिकारी कार्यालय नसल्यामुळे शेतकर्‍यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये स्वतंत्र तालुका कृषि अधिकारी कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच कृषि विभागातील रिक्त पदे भरून शेतकर्‍यांना वेळेत आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.

संबंधित बातम्या

Back to top button