पहिल्याच दिवशी खाजगी संस्थांच्या शाळा बंद

शिक्षण संस्था महामंडळाचे आंदोलन

अमरावती / 23 जून : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सोमवार, 23 जूनला विदर्भातील शाळा बंद आंदोलन जाहीर केले होते. या आंदोलनाला अमरावती जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील खाजगी संस्थाच्या सर्व शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सचिव मेघश्याम करडे, कोषाध्यक्ष महेंद्रसिंग सोमवंशी, सहसचिव सुशील इखणकर, यासह सदस्य जगन्नाथ हरणे, डॉ. आनंद घोंगडे, राजेश टारपे, श्रीपाद तारे यांनी आंदोलनात सहभाग घेणार्यांचे आभार मानले आहेत. शिक्षकांची रिक्त पदांची भरती, शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती, शिपाई पद भरती, थकित इमारत भाडे व वेतनेतर अनुदान, सर्व शैक्षणिक संस्थांना इमारत कर माफी या मागण्यांसाठी हे एक दिवसीय शाळा बंद आंदोलन पुकाररण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेने शाळा बंद ठेवल्याबद्दल अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, तसेच विदर्भ युथ वेलफेअर संस्थेचे उपाध्यक्ष युराजसिंग चौधरी यांचे विशेष आभार शिक्षण संस्था संघाच्या वतीने मानण्यात आले. आंदोलनामध्ये स्व. बबनराव वडनेरे शिक्षण संस्थांच्या शाळा, लक्ष्मणपुरी विद्यालय भंडारज, अहिल्यादेवी होळकर विद्यालय आसेगाव पूर्णा, विकास विद्यालय व सरस्वती विद्यालय अमरावती, जे. जे. खेरडे शाळा व एम. बी. पवार विद्यालय वरुड, शेळके हायस्कुल वाईखुर्द, शेळके हायस्कूल लिंगा, पंचफुलाबाई हरणे विद्यालय अंजनगावसुर्जी, जवाहरलाल विद्यालय आराळा, ता. दर्यापुर, जगदंबा विद्यालय वडगाव माहोरे, व्यंकटेश विद्यालय अचलपूर यासह अन्य शाळा सहभागी झाल्या होत्या. झीर्ळींरींश ीलहेेश्री लश्रेीशव बहुजनांच्या हक्काच्या मोफत शिक्षण देणार्या शाळा वाचविण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. शासनाने दखल न घेतल्यास नाईलाजाने पुढील आंदोलन करावे लागेल, असा इशारा अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button