प्रवीण पोटे यांचा शपथविधी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विजयानंतर

अमरावती/23 जून: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर प्रवीण पोटे पाटील यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदस्यत्वाची शपथ घेतली.
अमरावतीसह संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांनी विधानभवनात हजेरी लावली. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके वाजवून पोटे यांचे उत्साहात स्वागत केले. प्रवीण पोटे पाटील हे सलग तिसर्‍यांदा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. ही त्यांची तिसरी वेळ असल्याने सभागृहात त्यांना मानाचे स्थान मिळाले. पोटे यांच्या विजयामुळे अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात नवा उत्साह संचारला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर पोटे यांनी सभागृहातील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या शपथविधीमुळे पावसाळी अधिवेशनाची सुरुवात प्रभावी झाली असून, पोटे पाटील आता जनसामान्यांचे प्रश्न अधिक प्रखरतेने मांडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
राजकारणातील यशाचा अभ्यासू प्रवास-प्रवीण पोटे पाटील यांनी सातत्याने आपल्या कामातून जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. सलग तीन वेळा विधान परिषदेवर निवडून येणे ही त्यांच्या राजकीय परिपक्वतेची आणि जनसंपर्काची पावती आहे. अमरावतीच्या विकासासाठी घेतलेला पुढाकारआणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेली आहे. हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून सामान्यांच्या अपेक्षांचा सन्मान आहे.

संबंधित बातम्या

Back to top button