‘अमरावती च्या’आकर्षिका नृत्य संगीत विद्यालयाची बाजी

राष्ट्रीय स्तरावर यश; पटकावला अव्वल क्रमांक

अमरावती /19 जून : अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघातर्फे नागपूर येथे आयोजित ’ऑल इंडिया कल्चरल नॅशनल डान्स कॉम्पिटिशन’ या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ’आकर्षिका नृत्य संगीत विद्यालयातील’ विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट शास्त्रीय नृत्याची (कथक) जादू दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या बहारदार सादरीकरणाने परीक्षकांची व रसिकांची मने जिंकली. यामध्ये कनिष्का राहुल बोबडे हिने अवघ्या 9 व्या वर्षी तर दिविजा अनंत रोडे हिने 12 व्या वर्षी उत्कृष्ट कलागुण दाखवत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यालयातील सर्वच विजेत्या विद्यार्थिनींना त्यांचे नृत्य शिक्षक श्री. दिलीप शर्मा सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच उत्कृष्ट प्रशिक्षणा मुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे. कनिष्का राहुल बोबडे प्रथम पारितोषिक, दिविजा अनंत रोडे – द्वितीय पारितोषिक, परोल संनत उईके – तृतीय पारितोषिक, आरणा अमित सोमानी – तृतीय पारितोषिक आकर्षिका नृत्य संगीत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button