संत गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळा

भाजपा नेत्या माजी खा. नवनीत राणा यांनी सुध्दा हजारो महिला भक्तांसोबत केले 21 अध्यायाचे वाचन

सुनिल राणा व अनुपमा राणा मित्र परिवाराचे आयोजन

अमरावती /19 जून- अमरावती शहरातील शंकर नगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला श्री संत गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण व पादुका दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात हजारो महिला व गजानन भक्तांनी एकत्रितपणे विजयग्रंथातील 21 अध्यायांचे वाचन करून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त केला.
या धार्मिक कार्यक्रमात भाजपा नेत्या तथा माजी खासदार सौ. नवनीत राणा यांनीही हजारो महिला भक्तांसमवेत बसून 21 अध्यायांचे श्रद्धापूर्वक वाचन केले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला होता. सुनिल राणा व अनुपमा राणा मित्र परिवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास आ. रवि राणा, माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली ती अवघ्या 11 वर्षीय सुप्रसिद्ध विजयग्रंथ वाचिका कु. साक्षी सुनील ढगे. तिच्या सुमधुर व प्रभावी वाणीतून झालेल्या विजयग्रंथ पारायणाने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले. या प्रसंगी जयपूर (मोताळा), जि. बुलढाणा येथील देशमुख परिवाराकडे जतन करण्यात आलेल्या आणि श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन प्रथमच अमरावतीकर भक्तांना घेता आले. पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री. गंगाधरराव राणा व सौ. सावित्री गंगाधरराव राणा यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल राणा, मित्र परिवार तसेच अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे शंकर नगर परिसरात दिवसभर भक्ती, श्रद्धा व अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अमरावतीतील एक संस्मरणीय धार्मिक कार्यक्रम ठरला. यावेळी ह.भ.प.प्रमोद कराडे महाराज, गंगाधर राणा, सावित्री राणा, निळकंठराव कात्रे, मिरा कात्रे, सुनिल राणा, अनुपमा राणा, आ.रवि राणा, माजी खासदार सौ.नवनीत रवि राणा, डोलेंद्र पाटील, अंजु पाटील, प्रेमजीत पटले, जतीन राणा, आर्यन राणा, आरोही राणा, रणविर राणा व परीसरातील अनेक सदसृउपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button