एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना तात्काळ अटक करा
500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवर काँग्रेस आक्रमक

मुंबई/23 ऑक्टोबर : मनोज जरांगे यांच्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहे. महायुतीमधील भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन पक्षांमध्येच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करावी. ऑडिओ क्लिकपची चौकशी करण्यात यावी, महाराष्ट्राला सत्य समजायला हवं, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ते ब्लॅक अँड व्हाईट या साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
500 कोटींचा मुद्दा वगळता आम्ही मैदानावर आणि संघर्षात आहोत. सध्या तालुका पातळीवर आमचं आंदोलन सुरु आहेत. 500 कोटीकोणी दिले, कुठून आले याची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. माझं नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना खूल चॅलेंज आहे की, आरोप झालाय आणि ऑडिओचा पुरावा आलेला आहे. आपण तात्काळ एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांना अटक करावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.





