मोची गल्लीत देवीच्या जागरणाला भक्तांची गर्दी
देवीच्या भक्तिगीतांनी भाविक मंत्रमुग्ध

अमरावती /23 ऑक्टोबर – मोची गल्ली येथील श्री रक्षा नवदुर्गा महोत्सव मंडळाच्या वतीने विजयादशमीच्या दुसर्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या देवीच्या जागरणाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री 10 वाजल्यापासून सुरू झालेले जागरण उशिरापर्यंत रंगले. स्थानिक गायकांनी सादर केलेल्या देवीच्या भजनांनी परिसर भक्तिमय झाला. गायकांच्या सुरेल सादरीकरणाला भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
जागरणात मुलचंद वर्धसिंघानी, अमोल तिवलकर, शशी व्यास, श्रद्धा मेहरा, संदीप चावरे, अमन गुप्ता, अमित मेहरा, शगुन मेहरा, लखन पंचारिया, मयंक छांगाणी आणि मुकेश छांगाणी यांनी देवीची भक्तिगीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणामुळे जागरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देवीच्या गजरात भाविक तल्लीन झाले होते. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मोटवानी, स्वागताध्यक्ष नानकराम जी नेभनानी, संतोष गुप्ता, रोहित गोयल, शांतनु गुप्ता, शशी ठाकूर, श्रीकांत शर्मा, लक्ष्मी भैया, प्रफुल्ल सावरकर, ढालू मोटवानी, राजू केडिया, संजय गुप्ता अयोध्यावासी, अमित गोयल, कमल दुबे, बेनीप्रसाद दुबे, रमेश मेहरा, राजू मेहरा, विक्की लुल्ला, चीनू गुप्ता, अंकित मेहरा, बंटी मेहरा, अनिल उर्फ अन्ना पुरोहित, सोनू आचार्य, किरण मेहरा, रजनी मेहरा, शीतल मेहरा, विमला मेहरा, अनुराधा मुकेश छांगाणी, वर्षा मयंक छांगाणी आणि नारायण उर्फ नट्टूभाई चुडासामा यांच्यासह अनेक मान्यवर भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी देवीची आरती करण्यात आली. मुकेश छांगाणी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. त्यांनी आपल्या विनोदी शैलीत आणि दोह्यांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. भक्तिभाव, संगीत आणि उत्साहाच्या वातावरणात जागरणाची सांगता झाली.





