ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते
वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
मुंबई/19 जून-बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.
हिंमत असेल तर तुडवाला या, एकनाथ शिंदेंचे आव्हान काही लोक म्हणाले लांडगेंचे ऑपरेशन करतो. पण तो तर कम्पाउंडर आहे. तो कसा ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे. पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते. लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी धमक्या दिल्या होत्या. मुंबईतून यावेच लागेल. वरळीतून जावेच लागेल. मुंबई कुणाची जहागीर आहे का? एकनाथ शिंदे एकटा आला. गाडीमध्ये बसला, बायरोड वरळीत येऊन थांबला. तेव्हा धमक्या देणारे घरात बसून ऑनलाईन बघत होते. तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. आता काय तर ऑपरेशन तुडवा. हिंमत असेल तरसमोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.कार्यकर्ता जपला पाहिजे, घडला पाहिजे, वाढला पाहिजे – एकनाथ शिंदे निवडणूक आली की कार्यकर्त्यांचे लाड आणि निवडणूक झाली नजरेआड हे होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला उभारी देतात. हेच आपला प्रचार करत असतात. कार्यकर्ता जपला पाहिजे, घडला पाहिजे, वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तुडवण्याची भाषा करणार्यांवर…. पुढचे जाऊ द्या. त्यामुळे हजारो लोक आपल्यासोबत येत आहेत. दररोज येत आहेत. वेटींग लिस्ट मोठी आहे. का येत आहेत? मी एकटाच निघालो होतो. लोक येत राहिले. कारवा बनता गया. हा कारवा महाराष्ट्रात पसरलाय.शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला खासदार केले-राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक जण रांगेत उभे होते. परंतु आपल्या शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला म्हणजेच ज्योतीताई वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. या माध्यमातून आपण शिवसेनेची भूमिका राज्याला दाखवून दिली. अगोदर संपत्ती बघून तिकीट दिले जायचे. मंचावरच्या अनेकांनी मला आपल्या मुलासाठी तिकीट मागितले. परंतु मी त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांनाही मोठं केलं पाहिजे. त्यानंतर या सर्वांनीच तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. असे सहकारी माझ्यासोबत आहेत. असे सहकारी सोबत असण्यासाठी नशीब लागते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या 11 जागा आपण जिंकल्या शिवाय राहणार नाही. विरोधकांचे खाते देखील उघडणार नाही. त्यांची पाटी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकल्यावरही आपल्यावर आरोप केले. तुमचे उमेदवार टिकले नाही, पळून गेले. त्याला आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय आहे.एकनाथ शिंदे म्हणाले, आपली महायुती मजबूत आहे. तिन्ही पक्षांचे बॉडिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. काही लोक लपून छपून जाऊन त्यांना सांगतात. पण ते आम्हाला येऊन सगळं काही सांगतात. कारण आमचा अजेंडा खुर्ची नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवणे आहे. त्याच अजेंड्यावर आम्ही काम करतोय. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले, तरी ही महायुती महाराष्ट्रात वेगाने पुढे जाणार.




