प्रवीण पोटे यांचा विजय विक्रमी असेल-रवींद्र चव्हाण
अमरावतीत महायुतीची नियोजन बैठक

अमरावती/15 जून– महायुतीचे भाजपा उमेदवार प्रवीण पोटे यांचा विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विक्रमी विजयी होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
अमरावती दौर्यात निवडणूक तयारी आढावा घेण्यासाठी आलेल्या रवींद्र चव्हाण यांनी महायुतीतल्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची नियोजन बैठक मंगळवारी घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रवीण पोटे यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकार्यां ची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आतापर्यंतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या नियोजनावर चर्चा झाली. आमचे उमेदवार प्रवीण पोटे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. तसेच महायुतीचे राज्यभरातले अन्य उमेदवार देखील विजयी होतील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. बैठकीला महायुतीचे सर्वच बडे नेते हजर होते. त्यात भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा, गटनेता नाना आमले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे, भाजपाचे आमदार प्रताप अडसड, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, महापौर श्रीचंद तेजवानी, तसेच शिवसेना शिंदे गटाचे संतोष बद्रे, श्याम देशमुख, आशिष धर्माळे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. याशिवाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, रविराज देशमुख, प्रभुदास भिलावेकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, निवेदिता दिघडे, तुषार भारतीय, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर यांच्यासह महायुतीचे ठिकठिकाणचे नगराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




