अपघातातून थोडक्यात बचावले कृषी अधिकारी
हरिसालमध्ये कार पुलावरुन कोसळली

धारणी/ 22 जून : भरधाव आय-20 कार अनियंत्रित होवून पुलावरुन नाल्यात कोसळल्याने धारणी-परतवाडा मार्गावर भीषण अपघात घडला. या कारमधून कृषी मंडल अधिकारी अरुण पेठेकर प्रवास करित होते. अपघातानंतर तात्काळ मदत मिळाल्याने पेठेकर हे थोडक्यात बचावले.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी कृषी मंडल अधिकारी अरुण पेठेकर हे एमएच 27 / बीई 7676 क्रमांकाच्या आय-20 कारने धारणी-परतवाडा मार्गावरुन जात असताना हरिसाल नजीक कारवरील ताबा सुटुन कार अनियंत्रित झाली आहे. पुलावरुन खाली नाल्यात कोसळली. हरिसालच्या नर्सरीजवळ असलेल्या पुलावर हा अपघात घडला. यावेळी अन्य वाहनचालकांनी तात्काळ पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधून पेठेकर यांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.




