अवतारसिंह चव्हाण धारणीचे नवे ठाणेदार

अशोक जाधव यांची चांदूर बाजारला बदली

धारणी / 22 जून: अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस विभागात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांची चांदूर बाजार पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धारणीचे ठाणेदार म्हणून अवतारसिंह चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही अधिकारी संबंधित पोलिस ठाण्यात लवकरच पोलिस निरिक्षक पदाची जबाबदारी हाती घेणार आहेत.
धारणी येथे कार्यरत असताना अशोक जाधव यांनी आपल्या कार्यशैलीतून सर्वसामान्यांना सुरक्षा प्रदान करताना गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला होता. धमाकेदार कामगिरीमुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांची छाप पडली होती. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने नूकत्याच जिल्ह्यातील पोलिस निरिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले. त्यात अशोक जाधव यांचाही समावेश आहे. अशोक जाधव आता जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक म्हणून नेतृत्व करणार आहेत. जाधव यांच्या जागेवर धारणी येथे पोलिस निरिक्षक म्हणून बदलून आलेले अवतारसिंह चव्हाण यांची पोलिस प्रशासनात एक तडफदार अधिकारी म्हणून ओळख आहे. आपल्या विशिष्ट कार्यशैलीसाठी ते प्रसिद्ध आहे. धारणी तालुक्यात मेळघाटच्या विस्तिर्ण व दुर्गम जंगल भागात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.

Back to top button