सकल मातंग समाजाचे अ.जा.च्या वर्गीकरणा साठी बैठक
जिल्हाधिकार्यांना देणार निवेदन

अमरावती/28 एप्रिल: अनुसूचित जातीची अ ब क ड वर्गीकरण होण्यासाठी व त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी तसेच 01 मे पासून सुरु होणार्या जनगणना बाबत माहिती देण्यासाठी विश्राम गृह, चपराशी पुरा, कॅम्प येथे विविध संघटनना च्या प्रतिनिधी चे चर्चा सत्र नुकतीच आयोजित केले होती.ह्या महाचर्चा मध्ये विचारवंतानी आप आपले विचार व्यक्त केले.त्यामध्ये देवलाल अवचार राज्य समन्वयक, अमरावती यांनी संबोधित करताना स्पष्ट केले की, मातंग समाजाला वर्गीकरणा ची गरज का आहे? तसेच मातंग समाजाचा भावी पिढीचा विकास होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी, शिक्षणाची, नोकरची, रोजगाराची, सामाजिक परिवर्तन करण्यासाठी त्यान्च्या विचाराची गरज का आहे.तसेच बदर समितीचा रिपोर्ट जर तयार झाला असेल तर, तो सरकारने लवकरात लवकर सार्वजनिक करावा. त्याच प्रमाणे आपण आपल्या सूचना, हरकती, किंवा काही आक्षेप असतील तर त्या 30 एप्रिल 2026 पर्यंत सरकारकडे पाठवव्यात.
1 मे पासून सुरु होणार्या जनगणनेत योग्य माहिती भरून दिलेल्या वेबसाईट वर सबमिट कराव्यात. ही चर्चा यशस्वी करण्यासाठी श्री. विजय जोंधळेकर,(जिल्हा समन्वयक) श्री. गणेशदास गायकवाड, अध्यक्ष, टायगर फोर्स,उपस्थित होते. डॉ. रुपेश खडसे, विदर्भ प्रमुख लहुजी शक्ती सेना यांनी 13 वर्षापासून अनुसूचित जातीला उपवर्गीकरण व्हावे या साठी कधी पोतराज बनून,कधी कैदी बनून ,कधी लोटांगण घेऊन ,आमरण उपोषण ,पदयात्रा कडून सरकारचे लक्ष वेधून सरकारला उपवर्गीकरण करण्यासाठी मजबूर केले आहे असा इतिहास त्यांनी मांडला तसेच ज्ञानेश्वर झोंबडे, सामाजिक कार्यकर्ते,. बी. टी. अंभोरे, उपाध्यक्ष अण्णाभाऊ साठे कर्मचारी संघटना देविदास गायकवाड (तिवसा), अरुण सरकटे, कैलास स्वर्गे, फकिरा हिवराळे, आर बी. संतापे, सुभाष शिंदे, आकाश खडसे, प्रतीक शिंदे.आणी समाजातील बरेच व्यक्ती सहभागी झाल्या, त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणी चर्चा सत्र यशस्वी केली.पुढील कार्यक्रम व चर्चा सत्र हा बदर समितीचा अहवाल आल्यावर करण्याचे आणी जिल्हाधिकारी साहेबाना समाजाच्या वतीने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरले असे प्रवक्ता विजय जोंधळेकर यांनी सांगितले.आणी शेवटी ज्ञानेश्वर झोंबाडे यांनी आभार प्रदर्शन करून चर्चा सत्राची सांगता करण्यात आली.




