घरी नेलेले प्रेत शवविच्छेदनासाठी पुन्हा रुग्णालयात
विजेच्या धक्क्याने वाघडोहच्या तरुणाचा जागीच मृत्यू

* थरार! पाण्याच्या मोटारमध्ये होता करंट
* शवविच्छेदनावरून पोलीस- ग्रामस्थांत जुंपली
पथ्रोट / 18 मार्च : नव्या कोर्या स्वप्नांच्या घराला पाणी मारताना नियतीचा असा काही फास आवळला गेला की, अवघ्या विसाव्या वर्षी एका उमद्या तरुणाचा हसता-खेळता संसार उधळला गेला! अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या वाघडोह गावात गुरुवारी दुपारच्या सुमारास काळाने अशी काही झडप घातली की, संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. स्वतःच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न डोळ्यांत साठवून घराच्या बांधकामाला पाणी मारणार्या आनंद श्रीराम राजने या तरुणाचा शहापूर कालव्यातील पाण्याच्या मोटारमध्ये उतरलेल्या भीषण वीज प्रवाहामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, उत्तरीय तपासणीवरून पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये रंगलेल्या नाट्यमय घडामोडींनी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रखरखत्या उन्हात घाम गाळून आपल्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पाहणार्या एका उमद्या तरुणाला काळानं असं काही गाठलं की, अख्खं वाघडोह गाव हादरून गेलंय! अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या वाघडोह येथे गुरुवारी दुपारी नियतीने असा काही क्रूर विळखा घातला की, अवघ्या 20 वर्षांच्या आनंद श्रीराम राजने या पोराचा जागीच दुर्दैवी अंत झाला. घराच्या नव्या कोर्या भिंतींना पाणी मारण्यासाठी गेलेल्या आनंदला शहापूर कालव्यातील पाण्याच्या मोटारमध्ये उतरलेल्या विजेच्या जिवंत प्रवाहाने सावरण्याची साधी संधीही दिली नाही आणि त्याचे हसते-खेळते स्वप्न क्षणात मातीत मिळाले. वाघडोह येथील रहिवासी आनंद राजने याच्या नवीन घराचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू होते, वाढत्या उन्हामुळे भिंतींना तडे जाऊ नयेत म्हणून आनंद घराशेजारीच असलेल्या शहानूर कालव्यावर पाण्याची मोटार लावून ओलावा करण्यासाठी गेला होता. काम रंगात असतानाच अचानक ती विद्युत मोटार पाण्याच्या डोहात बुडाली अन् होत्याचे नव्हते झाले, संपूर्ण जलप्रवाहात विजेचा जिवंत लोळ पसरला आणि चालू मोटार ओढायला गेलेल्या आनंदला विजेच्या एकाच भीषण झटक्याने लांब फेकून दिले. या अनपेक्षित धक्क्याने आनंदचा जागीच जीव गेला आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. गावकर्यांनी आणि नातेवाईकांनी तातडीने कालव्याकडे धाव घेऊन बेशुद्ध अवस्थेतील आनंदला पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गोळे यांनी त्याला तपासून मृत घोषित करताच कुटुंबाने फोडलेला हंबरडा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी मृत्यूनंतर रुग्णालय परिसरात मोठा हायव्होल्टेज ड्रामा रंगला, गावातील काही स्थानिक पुढार्यांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देताच, उत्तरीय तपासणी न करता मृतदेह परस्पर घरी नेण्याचा घाट घातला होता. मात्र, खाकी वर्दीला या प्रकाराची भणक लागताच पथ्रोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार चौथनकर यांनी तावडीने मोठा फौजफाटा घेऊन गावात एन्ट्री केली. कायदेशीर प्रक्रिया आणि पोस्टमार्टम झाल्याशिवाय पार्थिव कोणत्याही परिस्थितीत ताब्यात मिळणार नाही, या भूमिकेवर पोलीस प्रशासन ठाम राहिल्याने संतप्त ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात मोठी जुंपली. रुग्णालय परिसरात तणावाचे सावट पसरलेले असतानाच, आपल्या पोटच्या गोळ्याचा निर्जीव देह पाहून मृतकाच्या मातेने केलेला आक्रोश पाहून पाषाणही पाघळला असता. मातेचा तो हृदयद्रावक टाहो ऐकून रुग्णालय परिसर सुन्न झाला होता. अखेर पोलिसांनी आपला हिसका दाखवत आणि कायदेशीर तरतुदी समजून सांगत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मृतदेह अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून, ठाणेदार चौथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार या मृत्यूच्या तांडवाचा आणि पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.




