वार्षिक स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळतो वाव
समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन थाटात

* डॉ. नितीन धांडे यांचे प्रतिपादन
अमरावती /18 मार्च : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय, अमरावती येथे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. (डॉ.) हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी तसेच कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनम चौधरी, प्रा. विनय गोहाड, पंकज देशमुख व प्रा. गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याचाच भाग म्हणून महाविद्यालयात स्नेह संभेलनाचे आयोजन करण्यात आले होते
येथील वार्षिक स्नेह संमेलनामध्ये समाजकार्य महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे तथा विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे हे होते तर अमरावती शहर पोलीस उपायुक्त श्री. गणेश शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. वि.यु.वे.सो. अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य श्री. पंकजभाऊ देशमुख, प्रमुख व प्रसिद्ध वक्ते डॉ. राजेश मिरगे, सकामचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड, रिलस्टार श्रीमती प्रज्ञा राऊत, सत्कारमुर्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित राजू बसवनाथे, श्रीमती ज्योती राठोड, श्री. विनोद गोळे, एन.एक्स.टी. संस्थेचे संचालक श्री. सुरेंद्र गेडाम, वार्षिक स्नेह संमेलनाचे समन्वयक डॉ. तुळशीराम राठोड, महिला समन्वयक डॉ. रंजना इंगोले, इत्यादी मान्यवरासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि संशोधक तसेंच बी.एस.डब्ल्यू, एम.एस.डब्ल्यू. एम.ए. समाजशास्त्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




