जी एच रायसोनी विद्यापीठ अमरावतीत 60 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश

अमरावती /16 मार्च : जी एच रायसोनी विद्यापीठ (जीएचआरयू), अमरावती येथे नुकत्याच आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये 60 विद्यार्थ्यांना विविध प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. ही उपलब्धी विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे.हे प्लेसमेंट मुख्यतः इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, सायन्स आणि फार्मसी यासारख्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, टीसीएस, विप्रो, एकेडमोर, एचसीएल टेक, अपग्रेड, पीएचएन टेक्नॉलॉजी, कॉग्निजंट, जस्ट डायल, ओकलंड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड – मेडनेट लॅब्स, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड, लेबेन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, एमईबी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, नितिका फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, झिम लॅबोरेटरीज, रिव्हँटेज अ‍ॅडव्हायझरी अँड रिअल्टर्स एलएलपी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयटी रत्न टेक्नॉलॉजी, सनसीड पॉवर इंडिया लिमिटेड, इंडियामार्ट, मुथूट फायनान्स लिमिटेड, सीझफायर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, लुपिन लिमिटेड, एनपी-एव्ही नेट प्रोटेक्टर या प्रमुख कंपन्यांचा समावेश होता । ज्यांनी वेग वेगळ्या फेरीत विद्यार्थ्यांची निवड केली।विद्यापीठाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलने या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. सेलने व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, मॉक इंटरव्ह्यू, अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट आणि स्किल डेव्हलपमेंट सत्रे आयोजित केली, ज्यामुळे विद्यार्थी भरती प्रक्रियेसाठी पूर्णपणे तयार झाले. या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट आणि कुलसचिव डॉ. स्नेहिल जैस्वाल यांनी प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पणासाठी अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, ही उपलब्धी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योग-अनुरूप अभ्यासक्रम आणि मजबूत स्किल वर्धन उपक्रमांच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

संबंधित बातम्या

Back to top button