थकबाकीदाराची मालमत्ता सील, स्वच्छता कंत्राटदाराला अडीच लाखांचा दंड

मनपा आमसभेचे पडसाद उमटायला लागले, अखेर प्रशासनाला आली जाग

दस्तुरनगरच्या हॉटेल लॉड्सवर कारवाई, 7 लाखांचा टॅक्स थकविला

अमरावती /11 मार्च : मालमत्ता कर थकबाकीदारांवर अमरावती महानगरपालिकेने आपली कारवाई अधिक तीव्र केली असून आज पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत दस्तूरनगर परिसरात एका थकबाकीदार मालमत्तेवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यामुळे महानगरपालिकेने ही कठोर कारवाई केल्याचे समजते.
महानगर पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दस्तूरनगर येथील मालमत्ता क्रमांक 381 ही श्रीमती कमलबाई खंडेलवाल यांच्या नावावर आहे. संबंधित मालमत्तेचा मालमत्ता कर बराच काळ प्रलंबित होता. महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाने या संदर्भात मालमत्ताधारकांना अनेक वेळा नोटीस बजावून थकीत कर भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच कर भरला नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्ती किंवा सीलची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र दिलेल्या मुदतीत थकबाकीचा भरणा न झाल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी आज दस्तूरनगर येथे भेट देत मालमत्ता क्रमांक 381 या वास्तूवर अधिकृतपणे सील लावण्याची कारवाई केली. यावेळी झोन क्र.3 चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, महानगर पालिकेच्या कर वसुली विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित ठिकाणी पंचनामा करून नियमांनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
अमरावती महानगरपालिकेने सध्या शहरात मालमत्ता कर वसुली मोहीम हाती घेतली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असताना थकीत कराची वसुली करण्यावर महानगरपालिकेने विशेष भर दिला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. यामुळे महानगरपालिकेच्या महसुलावर परिणाम होत असून शहरातील विकासकामांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यास सील, जप्ती किंवा इतर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. दरम्यान, दस्तूरनगर परिसरात झालेल्या या कारवाईमुळे इतर थकबाकीदारांमध्ये काही प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर तातडीने भरून महानगरपालिकेच्या कारवाईपासून वाचावे, असे आवाहनही अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महानगरपालिकेची ही मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र होणार असून थकीत कर वसुलीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार थकबाकीदार मालमत्तांवर सील लावणे, जप्तीची कारवाई करणे तसेच कायदेशीर पावले उचलणे यांसारख्या उपायांचा अवलंब करण्यात येणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. महापालिकेत लोकप्रतिनिधींचे शासन येताच स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. बडनेरा झोन क्रमांक 4 चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांनी स्वच्छतेच्या कामात कसूर करणार्‍या कंत्राटदारावर कडक कारवाई केली आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत कंत्राटदाराला दररोज 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तपासणी दरम्यान संबंधित कंत्राटदाराकडे आवश्यक कामगार आणि कचरा वाहून नेणार्‍या गाड्यांची संख्या निविदेतील अटींनुसार कमी असल्याचे आढळून आले. प्रत्येक प्रभागात किमान 20 सफाई कामगार आणि 10 वाहने असणे अनिवार्य असताना कंत्राटदाराने या नियमांचे उल्लंघन केले. यामुळे शहरातील अनेक भागांत कचर्‍याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ दंड लावून न थांबता कंत्राटदाराला कडक समज देण्यात यावी, अशी मागणी आता नगरसेवकांनी केली आहे.
कारवाईचे कारणे-अपुरे मनुष्यबळ प्रभागांमध्ये सफाई कामगारांची संख्या ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा अत्यंत कमी आढळली. वाहनांचा अभाव: कचरा संकलनासाठी आवश्यक गाड्या उपलब्ध नसल्याने कचरा उठाव रखडला होता.

संबंधित बातम्या

Back to top button