पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसीद्वारा श्रमसंस्कार शिबीर
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

अमरावती /11 मार्च : पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कमुंजा येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडले.
शिबिराच्या पहिल्या दिवशी, आंगनवाड़ी व सांस्कृतिक परिसरात स्वच्छता अभियान राबवन्यात आले. त्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला यानंतर आयुर्वेदोपचार शिबिर राबवन्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिप्ती बी रुईकर अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून निशाताई राऊत (सरपंच, कमुंजा ग्राम) यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.अमित जयस्वाल सर महिला कार्यक्रम अधिकारी प्रगती काटकीडे मॅडम ,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.या प्रसंगी उद्घाटन सौ. निशाताई राऊत यांनी स्वयंसेवकांना समर्पित भावनेने श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले व ग्रामविकासासाठी योगदान देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिप्ती रुईकर यांनी शिबिराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सौ. निशाताई राऊत यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रमसंस्काराच्या महत्त्वावर भाष्य करत, समाजकार्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे आवाहन केले.




