खा.डॉ.अनिल बोंडे भूषवणार राष्ट्रीय परिषदेचे मुख्य अतिथीपद

दिल्लीत दुर्मीळ आजारांवर होणार महामंथन

* अमरावतीचा आवाज आता संसदेच्या व्यासपीठावर

अमरावती /10 मार्च : जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि भारतीय वैद्यकीय संसद सदस्य मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांची निवड दिल्लीतील ‘दुर्मीळ आजार कृती परिषदे’साठी सन्माननीय अतिथी म्हणून करण्यात आली आहे. येत्या 11 मार्च रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे ही महत्त्वाची परिषद पार पडणार असून, देशातील 7 ते 8 कोटी दुर्मीळ रुग्णांच्या हितासाठी डॉ. बोंडे धोरणात्मक भूमिका मांडणार आहेत. अमरावतीचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर गाजणार आहे. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांना आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित ’आय.एच.डब्ल्यू.’ संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत विशेष निमंत्रित म्हणून बोलावले आहे. देशात सध्या लाखो कुटुंब दुर्मीळ आजारांच्या विळख्यात असून, उपचारांचा अवाढव्य खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या गंभीर विषयावर संसदेत ठोस कायदा आणि धोरण तयार व्हावे, यासाठी ही परिषद अत्यंत कळीची ठरणार आहे. डॉ. अनिल बोंडे हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आणि संसदेतील वैद्यकीय मंचाचे प्रमुख असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा थेट धोरणकर्त्यांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना महागडे उपचार कसे परवडतील आणि शासनाची मदत त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल, यावर ते या परिषदेत मार्गदर्शन करतील. अमरावती जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, या परिषदेमुळे राष्ट्रीय आरोग्य धोरणात आपल्या मातीतील नेतृत्वाचा मोठा वाटा असणार आहे.
सामान्यांचा आधार दुर्मीळ आजारांशी लढा-दुर्मीळ आजारांच्या रुग्णांना आणि त्यांच्या हताश कुटुंबांना मदतीचा हात मिळावा, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून संसदेच्या दारात या प्रश्नांची प्रभावी मांडणी होईल, अशी आशा आता निर्माण झाली आहे

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button