पालकमंत्र्यांनी दाखविली चित्ररथांना हिरवी झेंडी

विद्यार्थ्यांना होणार शासनाच्या विविध योजनांची माहिती

अमरावती /10 मार्च : जिल्हा नियोजन व विकास समिती आणि अनुसूचित जाती उपयोजनेतून योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे साकारण्यात आलेल्या दोन चित्ररथांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्रामगृह येथे हिरवी झेंडी दाखविली. दोन्ही चित्ररथ जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये पोहोचून योजनांची माहिती देणार आहे.
यावेळी खा.डॉ. अनिल बोंडे, आ.राजेश वानखेडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी ग्रामीण भागात योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी चित्ररथाची संकल्पना महत्वाची ठरणार आहे. चित्ररथ हा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत नेण्यात यावा. चित्ररथाच्या माध्यमाने शाळांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदी आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपाटिका, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आयुष्मान भारत कार्ड या योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. यातून भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, कन्यादान योजना, मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह, कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारत सरकार मॅट्रीकोपूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांचा प्रचार करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button