ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी जागृती करा
जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने

* जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे निवेदन
अमरावती/10 मार्च –आगामी 15 मार्च रोजी येणार्या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अमरावती तर्फे निवेदन सादर दि. 15 मार्च रोजी येणार्या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी व जाग्रृती करण्याच्या दृष्टिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा विभाग, तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण विभाग यांना अमरावती जिल्हा व महानगर पदाधिकारी तर्फे विविध विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. निनाद लांडे यांनी निवेदन स्विकारून तुमच्या मागणी प्रमाणे ग्राहक दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. तसेच कामगार उपआयुक्त श्री. थोरात साहेब यांनी नव्याने अमरावती मध्ये पदभार स्विकारल्या बद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनीही कामगारांच्या कल्याण साठी नेहमी कटीबध्द राहिल असे आश्वासन दिले. यावेळी गजानन मुद्गल, स्टेट चेअरमन, महाराष्ट्र राज्य, प्रभाकरराव वानखडे, राज्य सचिव, महाराष्ट्र, श्री. निलेश रमेश टवलारे, महानगर अध्यक्ष, श्रीमती उज्वलाताई महाजन, राज्य उपाध्यक्ष, श्रीमती कल्पनाताई कुरमबंसी, विदर्भ अध्यक्ष महिला विंग. शुभांगी सोळंके, विदर्भ कार्याध्यक्ष, महिला विंग, निताताई डाखोडे,विदर्भ उपाध्यक्ष, मयुर नरेश बासुंदे, जिल्हाध्यक्ष, नंदाताई राऊत जिल्हाध्यक्ष, महिला विंग, मनिषाताई मडावी, महानगर अध्यक्ष महिला विंग, श्री. महेश पंडीत, सहसचिव, रोहन ढोमणे, जनसंपर्क प्रमुख, मुकेश पवार, महानगर संघटक, बाळासाहेब देसाई आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




