अश्लील फोटो तयार करुन व्हायरल करण्याची धमकी

बेनोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलल घटना, आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

वरुड । 9 मार्च – महिलेची ईच्छा नसतांना लग्न करण्याकरीता अश्लील फोटो तयार करुन व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमुद घटनावेळी व ठिकाणी यातील आरोपी अजिंक्य सुभाषराव आकोटकर (26), रा.चंद्रनगर लोणी, ता.वरुड हा 24 वर्षीय फिर्यादी महिला हिची ईच्छा नसतांना लग्न करण्याकरीता जवळीक साधत असुन फिर्यादीची बदनामी करुन अश्लील फोटो तयार करुन व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादीचे जुळलेले लग्न तोडुन आरोपी अजिंक्य याने फिर्यादीस आरोपी अजिंक्य याचेसोबत लग्न केले नाही तर फिर्यादीस व फिर्यादीचे घरच्या लोकांना मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 24 वर्षीय फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन बेनोडा पोलिसांनी आरोपी अजिंक्य सुभाषराव आकोटकर (26), रा.चंद्रनगर लोणी, ता.वरुड याचेविरुध्द भादंवि 74, 78 (1), (2), 352, 351 (2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलिस करीत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button