अविनाश मार्डीकर यांनी स्वीकारली तिजोरीची चावी

खोडके दांपत्याच्या उपस्थितीत भव्य पदग्रहण

* शहराच्या वैभवासाठी एकवटले सर्व पक्ष

अमरावती /8 मार्च : स्थानिक महानगरपालिकेच्या सत्ताकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या स्थायी समितीच्या सभापती पदाची सूत्रे आज अविनाश गुलाबराव मार्डीकर यांनी अत्यंत उत्साहात स्वीकारली. रविवारी सकाळी सुदामकाका देशमुख सभागृहात झालेल्या या सोहळ्यात आमदार संजय भाऊ खोडके आणि आमदार सुलभाताई खोडके यांच्यासह शहरातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. नव्या सभापतींनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आणि पालिकेची आर्थिक घडी बसवण्याचा संकल्प सोडला असून, खोडके दांपत्याने अमरावतीच्या प्रगतीसाठी शासन दरबारी मोठा निधी खेचून आणण्याची ग्वाही दिली आहे.
महानगरपालिकेच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात असतात, त्या स्थायी समितीच्या सभापती पदी मार्डीकर यांची वर्णी लागल्याने राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याला महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, पक्षनेते चेतन गावंडे यांच्यासह नगरसेवकांची मोठी फळी उपस्थित होती. यावेळी बोलताना आमदार सुलभाताई खोडके यांनी शहराच्या आर्थिक उन्नतीवर भर दिला. महिलांचे स्वावलंबन, बचत गटांचे बळकटीकरण आणि स्थानिक उद्योगांना बळ दिल्यास शहराचा कायापालट होईल, असे त्या म्हणाल्या. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार संजय भाऊ खोडके यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. राज्य शासनाने गेल्या काही दिवसांत रस्ते विकासासाठी मोठा निधी दिल्याने पालिकेचा भार हलका झाला असून, आगामी काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पदभार स्वीकारल्यानंतर अविनाश मार्डीकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, नेत्यांनी जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट घेईन. पालिका प्रशासन आणि शासन यांच्यात योग्य समन्वय राखून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली प्राथमिकता राहील. या कार्यक्रमाला यश खोडके, प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर, ममता आवारे, स्मिता सूर्यवंशी, प्रियंका पाटणे, मीनल सवई, प्रशांत वानखडे, चंदू खेडकर, गुड्डू धर्माळे, मनीष बजाज, नजीम खान, करीम खान, भोजराज काळे, किशोर शेळके, प्रशांत डवरे, दिलीप शेलोटकर, उत्तमराव शिंगणापूर, प्राचार्य ओम प्रकाश भगत, राजेश जवंजाळ, उमेश सहारे, प्रवीण आकोडे, श्याम दळवी, संजय यादव, निलेश कंचनपुरे, निखिल जवंजाळ, सुधाताई ठाणेकर, अक्षय चव्हाण, सोनू कपले, पांडुरंग चंडिकापुरे, पप्पू खत्री, किशोर भुयार, किशोर देशमुख, निलेश शर्मा, भाऊ सगणे, छोटू पाटील, संजय कुकरेजा, कमल खत्री, बबन कापडी, दीपक उत्तराधी, जितू ठाकूर, विशाल कुलकर्णी, विशाल खोडके, नितीन भेटाळू, अशोक हजारे, बाळासाहेब मार्डीकर, विनोद गुडधे पाटील, भास्कर ढेवले, राजीव ठवरे, प्रवीण अढाऊ, अमोल प्रांजळे, अमोल देशमुख, नजीब खान, संकेत महल्ले, ऋतुराज राऊत, सादिक भाई, उमेश वानखडे, श्रीकृष्ण परतेकी, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, श्यामसुंदर देव, दत्तात्रय फिस्के, भूषण पुसतकर, संदीप वडूरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासाचा नवा अध्याय-नवनियुक्त सभापती अविनाश मार्डीकर यांच्या पदग्रहण सोहळ्याने महापालिकेत नवचैतन्य आले आहे. शहराच्या तिजोरीचे रक्षण करतानाच सामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असून, सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित बातम्या

Back to top button